राजकीय

हा कायदा गोकुळ पुरता मर्यादित राहणार नाही…: बाळासाहेब थोरात

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

मुंबई – राज्य सरकारकडून गोकुळ दुध संघात शासकीय प्रतिनिधींच्या नियुक्तींचा घाट घातला जात आहे. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी, सहकाराबाबत करण्यात येणारा हा नवीन कायदा  गोकुळ पुरता मर्यादित राहणार नाही, तो कायदा पूर्णपणे सहकाराला लागू होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

 जिथे सत्ता नाही, तिथे सत्ता मिळवण्याचा यातून प्रयत्न केला जात आहे. सध्या या कायद्यातून साखर कारखाने, सहकारी बँका वगळण्यात आल्या असल्या तरी ते पुन्हा बदल करून साखर कारखाने, सहकारी बँका, विकास सोसायटीत हा कायदा घेवू शकतात.

यातून सरकार महाराष्ट्राचा सहकार मोडीत काढण्याचे पाप करत आहे ते करू नये. मुख्यमंत्र्यांनी या पापाचा धनी होऊ नये. तुम्ही लोकशाहीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने राज्याच्या आणि केंद्राच्या सत्ता बळकवल्यात आता तुम्ही सहकारातील सत्ता बळकावल्या आहेत हे सर्व उलटे-पालटे उद्योग करत आहात. ते अत्यंत चुकीचा आहे. गोकुळच्या पराभवाचा सूड घेण्याकरता म्हणून करत असलेल्या या उपाययोजना निकोप सहकार मोडण्याकरता होणार आहे या पापाचे   धनी मुख्यमंत्र्यांनी होऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे.

संबंधित विषय

Scroll to Top