आंदोलन

संविधान सन्मानचे निलेश बनसोडेंचे आमरण अन्नत्याग आंदोलन आश्वासनानंतर स्थगित

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – शहरातील  ई वॉर्डमधील राजगौरव मंगल कार्यालय ते लिशा हॉटेलसमोरील रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या सामासिक अंतरातील अनधिकृत बांधकामे, पत्राशेड आणि नम्रता अपार्टमेंट येथील अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्याची मागणी संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश बनसोडे यांनी केली आहे. मात्र गेल्या तीन वर्षांपासून व पाठपुरावा करूनही कोणतीच कारवाई होत नसल्याने बनसोडे यांनी आजपासून महानगरपालिकेसमोर आमरण अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. एकीकडे महानगरपालिका गोरगरीब फेरीवाल्यांवर अतिक्रमणविरोधी कारवाई करते तर  दुसरीकडे बड्या व्यावसायिकांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जोपर्यंत प्रत्यक्ष कारवाई होत नाही, तोपर्यंत आमरण अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता. दरम्यान, त्यांनी महापालिकेचे विरोधी पक्षनेते राजेश लाटकर आणि काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे यांच्यासह काँग्रेसच्या नगरसेवकांनाही दिले आहे.  त्यांच्या मध्यस्तीनंतर आणि आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या आश्वासनानंतर बनसोडे यांनी आंदोलन स्थगित केले आहे.  

संबंधित विषय

Scroll to Top