अपघात

कबनूर चौकात चार चाकी वाहनाची दुचाकीला धडक…

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

इचलकरंजी  – शहरालगत असलेल्या कबनूर चौकात चारचाकी वाहन आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात घडला आहे. या अपघाताचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.  सुशांत शेवाळे हे खोतवाडी येथून इचलकरंजी – कबनूर मार्गावरून जात असताना कबनूर चौकात एका चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. सुशांत शेवाळे हे या अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर आय जी एम रुग्णालयात सुरू आहे.

धडक दिल्यानंतर चारचाकी वाहनाच्या चालकाने घटनास्थळी न थांबता तिथून पळ काढला. अपघाताचे दृश्य समोर आल्यानंतर वाहनचालकांच्या बेजबाबदारपणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

संबंधित विषय

Scroll to Top