आंदोलन

किणी टोल नाक्यावरील चक्काजाम आंदोलनात शेतकऱ्यांची गर्दी… महामार्गावर ठिय्या

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – उसाला पहिली उचल प्रतिटन ४ हजार ५०० रुपये मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांनी महामार्गावर ठिय्या मारला असून महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून छावणी आंदोलन सुरू आहे. उसाच्या पहिल्या उचलीवरून प्रशासन आणि साखर कारखानदारांसोबत चर्चेच्या दोन फेऱ्या पार पडल्या. मात्र, त्यातून कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे संघटनेने आक्रमक पवित्रा घेत चक्काजाम आंदोलन सुरु केले आहे.

संबंधित विषय

Scroll to Top