आंदोलन

उद्या किणी टोलनाक्यावर शेतकरी रास्ता रोको आंदोलन करणार…

pnigave अपडेट: 2 November 2026, 3:06 PM 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – राज्यात ऊस दरावरून शेतकरी आक्रमक झाले आहेत यासाठी प्रशासनासोबत बैठक होवूनही तोडगा निघत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. यावर बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी, कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने ३६०० ते ३७०० उसाला दर देतात, सांगली जिल्ह्यातील कारखाने ३६०० ,पुणे जिल्ह्यातील कारखाने ३५००, कर्नाटक सीमाभागातील कारखाने ३५०० दर देण्यासाठी साखर कारखानदारांनी एकजूट केली असेल तर मग शेतकऱ्यांनी ४५०० रूपये मिळविण्यासाठी एकजूट का करू नये, असा सवाल करत त्यांनी उद्या होणाऱ्या पुणे – बेंगलोर महामार्गावरील रास्ता रोको आंदोलनात शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

संबंधित विषय

Scroll to Top