कोल्हापूर – गोकूळ दुध संघाच्या निवडणूकीत निवडून आलेल्या समविचारी आघाडीच्या संचालकांचा पाटील कुटुंबियांच्यावतीने सत्कार करण्यात आला. शांतदेवी डी. पाटील, डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपचे डॉ. संजय डी. पाटील, आमदार सतेज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील आणि तेजस पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात समविचारी आघाडीच्या सर्व संचालकांचे पाटील कुटुंबियांच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच पूजा ऋतुराज पाटील, वृषाली पृथ्वीराज पाटील, स्नेहा तेजस पाटील आणि देवश्री सतेज पाटील यांनी नवनिर्वाचित संचालकांना औक्षण करून त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीला शुभेच्छा दिल्या.
या सत्कार सोहळ्यात गोकुळचे संचालक शशिकांत आनंदराव पाटील (चुयेकर), शशिकांत खोत, राजूबाबा आवळे, अभिजित प्रभाकर तायशेटे, प्रा. किसन बापूसाो चौगले, बाबासाहेब श्रीपती चौगले, राहुल बजरंग देसाई, विद्याधर बाबुराव गुरबे, बाबासाहेब देवकर, बयाजी शेळके, विश्वजीत जाधव, अंजना केदारी रेडेकर आणि भाग्यश्री धीरज डोंगळे आदींचा सन्मान करण्यात आला.




