ब्रेकिंग न्यूज
धार्मिक

जोतिबाच्या दर्शनासाठी लाखों भाविकांची गर्दी…

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर –  दख्खनचा राजा श्री जोतिबा नवरात्रोत्सवाच्या सातव्या माळेला जागर झाला. आज जोतिबाची पाच पाकळ्यांच्या कमळ पुष्पातील सरदारी रूपात बैठी सालंकृत महापूजा बांधली. ही पूजा समस्त १० गावकर  पुजाऱ्यांनी बांधली. यावेळी जोतिबा देवासमोर प्रतिकात्मक अश्व पूजा बांधण्यात आली होती. जोतिबा मंदिर गाभाऱ्यात जेरबेरा फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

 सकाळी १० वाजता धुपारती सोहळा निघाला. मंदिरात आणि मंदिरा बाहेर कडाकणी, तेल अर्पण करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. जागराला लाखो भाविक जोतिबा डोंगरावर दाखल झाले आहेत. प्रशासनाच्यावतीने भाविकांना सुलभ दर्शनाची सोय करण्यात आली होती. जागरनिमित्त मंदिर आज रात्रभर भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार आहे.

संबंधित विषय

Scroll to Top