ब्रेकिंग न्यूज
राजकीय

महाविकास आघाडीचे उमेदवार ताकदवान, ते नक्कीच विजयी होतील : खा. सुप्रिया सुळे

एस न्यूज प्रतिनिधी 2 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – आम्ही महाविकास आघाडीच्यावतीने पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातून कर्तृत्ववान आणि ताकदवान उमेदवार उभे केले आहेत ते विजयी होतील, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

पुणे पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख जाधव आणि पुणे शिक्षक मतदार संघातील उमेदवार प्राध्यापक जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ आज त्या कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या. आज दुपारी त्यांनी उमेदवार हर्षदा देशमुख जाधव यांच्या समवेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या.

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना लोकशाहीत कोण काय बोललं तर ते सगळं मनाला लावून घ्यायचं नसतं असं सांगत राऊत यांच्या टीकेकडे त्यांनी दुर्लक्ष केले. आपल्याला याबाबत उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत यापैकी कुणाचाही फोन आलेला नसल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेअंतर्गत घोषणा केलेली शेतकऱ्यांची थकीत रक्कम त्वरित खात्यावर जमा करावी,  दुष्काळग्रस्त परिस्थितीत शेतकऱ्याला हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत करावी, सरसकट कर्जमाफी करण्यात यावी, बँक वसुली तात्काळ थांबवावी, रोजगार हमी योजना पूर्ववत सुरू करावी, दुष्काळ असलेल्या भागात सर्वत्र टँकरने पाणीपुरवठा करावा या आपल्या मुख्य मागण्या असल्याचे त्यांनी सांगितले.

शक्तिपीठ महामार्ग करण्यासाठी सरकारकडे एक लाख कोटी रुपये आहेत मात्र शेतकऱ्याला मदत करण्यासाठी एक लाख रुपये नाहीत का? असा टोला खा. सुळे यांनी राज्य सरकारला लगावला.

मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबद्दल बोलताना त्यांनी नाव घेणे टाळत माझा जन्म महाराष्ट्राच्या मातीत झालाय, मी सत्यमेव जयते मानते, मी कधी चुकलेले नाही त्यामुळे मला घाबरायची गरज नाही असे त्यांनी सांगितले. देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांबद्दल बोलताना खासदार सुळे यांनी ज्ञानेशकुमार यांना व्यक्ती म्हणून आमचा विरोध नाही तर अशा प्रवृत्तीला आमचा विरोध राहील असे स्पष्ट केले म्हणून सरकारने आता आयडीबीआय बँक विकायला सध्या महागाई प्रचंड वाढलीय सरकारकडे पैसे नाहीत काढलीय, असा आरोप त्यांनी केला.

 देश संविधानावर , लोकशाहीवर चालतो. लोकशाही वाचवण्यासाठीच आमची लढाई सुरू आहे, असे देखील सुळे यांनी सांगितले. या पत्रकार बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, अनिल घाटगे, सारंग पाटील, पद्मजा तिवले आदी उपस्थित होते.

संबंधित विषय

Scroll to Top