कोल्हापूर – ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक उदय कुलकर्णी यांचे आज निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते कॅन्सरच्या आजाराशी झुंज देत होते. यामध्येच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.
उदय कुलकर्णी हे पत्रकारिता, साहित्य, सिनेमा, संगीत, नाटक आणि सामाजिक-पर्यावरणीय विषयांचे गाढे अभ्यासक होते. १९९७ पासून त्यांचे विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमध्ये लेखन सुरू होते. त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘लोकसत्ता’, ‘सकाळ’, ‘लोकमत’, ‘नवाकाळ’, ‘प्रहार’ यासारख्या प्रमुख दैनिकांमधून आणि ‘चित्रलेखा’सारख्या नियतकालिकांमधून स्तंभलेखन केले आहे.




