ब्रेकिंग न्यूज
आंदोलन

ऊस आंदोलनाचा एसटीला फटका ; कोल्हापूरहून बेळगावला जाणाऱ्या १०० हून अधिक बसेस रद्द

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – ऊस उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कालपासून कोल्हापूर-बेळगाव सीमेवरील कोगनोळी टोल नाका येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. २४ तास उलटून गेले तरी हे आंदोलन सुरूच असून या आंदोलनाचा फटका एसटीसह वाहतूकदारांना बसला आहे.
या आंदोलनामुळे कोल्हापुरात भाजीपाल्याचे दर ३० ते ४० टक्क्यांनी वाढले आहे. कोल्हापूरहून बेळगावला जाणाऱ्या १०० हून अधिक एसटी बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. कोल्हापुरातील लक्ष्मी टेकडी आणि फाईव्ह स्टार एमआयडीसी परिसरात हजारो ट्रक आणि कंटेनर अडकून आहेत.

संबंधित विषय

Scroll to Top