ब्रेकिंग न्यूज
राजकीय

देशाची राजधानी तुरुंग का बनतय..? : राहुल गांधींचा सवाल

एस न्यूज प्रतिनिधी 2 मिनिटे वाचन
शेअर करा

संविधानाच्या सुरक्षेसाठी आंदोलनात सहभागी व्हा : राहुल गांधींचे आवाहन

नवी दिल्ली – मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात नवी दिल्लीत जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला दिल्ली पोलिसांकडून तीव्र विरोध केला जात आहे. त्यासाठी दिल्लीत 20 ते 30 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. इतका बंदोबस्त कशासाठी करण्यात येतोय ?, दिल्लीत एवढी तटबंदी का ?, लोकांना दिल्लीत येण्यापासून का रोखलं जातंय ?, रेल्वे, मेट्रो बंद केले जात आहेत. दिल्लीत आंदोलनासाठी परवानगी का दिली जात नाही ? देशाची राजधानी तुरुंग का बनतंय, असा संतप्त सवाल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेवून उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
आंदोलन करणे हा सर्वांचा हक्क आहे. सरकारमधील 200 अधिकारी आमच्या बाजूने आहेत, असे राहुल गांधींनी म्हटले आहे. कितीही वेळ लागला तरी आमचा लढा सुरूच राहणार आहे. केंद्र सरकार ज्ञानेश कुमारांचं संरक्षण करत आहे परंतु आम्ही त्यांना सोडणार नाही. लोकशाही आणि न्यायासाठी हे आंदोलन सुरू आहे. सरकारमुळे पोलीस कर्मचारीही हैराण झाले आहेत.

संविधानाची सुरक्षा करण्यासाठी कोणीही आमच्या आंदोलनात सहभागी व्हावे, भाजपमधील कोणत्याही व्यक्तीला या आंदोलनात सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी बिनधास्त यावं, देशाला वाचण्यासाठी आणि संविधान सुरक्षित करण्यासाठी न भीता सर्वांनी यावं, असे आवाहन खा. राहुल गांधी यांनी केले आहे. ज्याला ज्या पद्धतीने आंदोलन करायचं आहे त्यांनी करावं पण व्यक्त व्हावं, आपली प्रतिक्रिया द्यावी. कारण हा देश आपला आहे आपणच पुढे येवून जे होत आहे त्याला विरोध केला पाहिजे, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

संबंधित विषय

Scroll to Top