कोल्हापूर – आज करवीर निवासिनी अंबाबाई देवीची पूजा नंदा देवी रुपात पूजा बांधण्यात आली आहे. सोन्याप्रमाणे अंगकांती असलेली, सोन्याप्रमाणे सुंदर वस्त्र धारण केलेली सुवर्ण वर्णाची आणि उत्तम सुवर्णालंकारांनी अलंकृत असलेली देवी आहे. कमळ. अंकुश, पाश आणि शंख धारण करणारी चतुर्भुजा, सोन्याच्या कमळावर विराजमान असलेली इंदिरा, कमला, लक्ष्मी या नावाची ओळखली जाणारी देवी अशी तिची महती वर्णन केली आहे. ही पूजा अजिंक्य मुनिश्वर, वेदांग मुनिश्वर आणि सोहम दिलीप मुनिश्वर यांनी बांधली आहे.




