मुंबई – पुण्यात गेल्या काही दिवसांपासून एमपीएससीचे विद्यार्थ्यी आंदोलन करत आहेत. याबाबत आज राज ठाकरे यांनी ट्वीट करून, येत्या काही दिवसांत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांसंदर्भात एक चांगली बातमी येईल, असे म्हटले आहे.
राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे कि, ५ ऑक्टोबर २०२६ ला मी जेंव्हा पुण्यात एमपीएससी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. तेंव्हा मी तुमचं म्हणणं, तुमच्या रास्त अपेक्षा याबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलेन असं आश्वस्त केलं होतं. स्वतःचा राहता जिल्हा, तालुका, आपलं घर तसेच आपल्या कुटुंबाला सोडून नोकरीसाठी राब राब राबणाऱ्या तरुणांना आणि तरुणींना पाहिलं की जिवाची कालवाकालव होते. म्हणून आज या विषयावर माझी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली. ते देखील पूर्णपणे सकारात्मक आहेत हे जाणवलं. आणि येत्या काही दिवसांत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यां संदर्भात एक चांगली बातमी येईल अशी अपेक्षा आहे. तेंव्हा विद्यार्थ्यांनी देखील संयम ठेवावा.




