कोल्हापूर – शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती चॅरिटेबल ट्रस्ट आणि भवानी मंडपातील गाळेधारकांच्यावतीने आज भवानी मंडप परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी तुळजा भवानी मंदिर, भवानी मंडप, नगारखाना परिसराची स्वच्छता करण्यात आली. भवानी मंडप कमानीवरील झाडे झुडपे काढून दोरखंडाच्या साहाय्याने कमान स्वच्छ करण्यात आली. दुपारी चार वाजेपर्यंत ही स्वच्छता मोहिम सुरु होती.




