१९ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश होणार…
मुंबई – काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांची यादी जाहीर केली होती. परंतु या यादीमध्ये राज्यातील अनेक दुष्काळग्रस्त तालुक्यांचा समावेश न केल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे याचा विचार करून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी, आज पत्रकार परिषद घेवून 19 तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यासाठी प्रस्ताव तातडीने पाठवण्यात आल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटले आहे कि, राज्य सरकारने आतापर्यंत 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, 25 सप्टेंबरच्या शासन निर्णयात 75 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आले आहे, मात्र दुष्काळाच्या निकषात न बसणाऱ्या आणखी 19 तालुक्यांचा फेरविचार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत की, पंचनामे करण्यात यावेत. शेतकरी नुकसान किती झालं आहे याचा आढावा घ्यावा. राज्यात 1 कोटी 49 लाख हेक्टर 65 लाख 26 हेक्टर जमिनीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. बाकी काम देखील सुरू आहे. 10 तारखेपर्यंत सर्व पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
यामध्ये नांदेड जिल्ह्यातील सुरतखेडा, मुखेड, अर्धापूर
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर, ब्रह्मपुरी, बल्लारपूर
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, देवरी, सालेकसा, गोंदिया,
वर्धा जिल्ह्यातील कारंजा
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी, तुमसर
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड, निफाड
सातारा जिल्ह्यातील पाटण
सांगली जिल्ह्यातील शिराळा, कडेगाव आदी १९ तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त यादीत होणार आहे.




