ऑक्टोबरमध्ये पावसाचे संकेत ; महाराष्ट्राच्या काही भागांत सरींची शक्यता

कोल्हापूर –  हवामान विभागाच्या विस्तारीत पल्ल्याचा हवामानाच्या अंदाजामध्ये १ ऑक्टोबरपासून पुढील चार आठवड्यांचा पर्जन्यविषयक अंदाज देण्यात आला आहे. त्यानुसार १ ते ८ ऑक्टोबर, ८ ते १५ ऑक्टोबर, १५ ते २२ ऑक्टोबर आणि २२ ते २९ ऑक्टोबर, अशा चार टप्प्यांमध्ये हा अंदाज मांडण्यात आला आहे. या मॉडेलच्या नकाशात महाराष्ट्रासह दक्षिण भारताच्या काही भागांमध्ये पावसाचे संकेत दिसत आहेत. विशेषतः पुढील आठवड्यांमध्ये दक्षिण द्विपकल्पातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता कायम राहण्याचे संकेत आहेत. मात्र हा दीर्घ पल्लूयाचा मॉडेल अंदाज आहे. त्यामुळे एखाद्या विशिष्ट जिल्ह्यात किंवा एखाद्या दिवशी किती पाऊस पडेल, हे या अंदाजावरून निश्चित सांगता येणार नाही.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाकडून ५ दिवसांचा जिल्हानिहाय आणि ७ दिवसांचा उपविभागनिहाय पावसाचा अंदाजही प्रसिद्ध केला जातो. त्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक पावसाची स्थिती जाणून घेण्यासाठी येणाऱ्या काळातील जिल्हानिहाय अंदाज महत्त्वाचा ठरणार आहे. सप्टेंबर महिना कोरडा गेल्याने खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांना आता परतीच्या पावसाची आशा आहे. मान्सूनच्या परतीच्या प्रवासात पावसाचे संकेत कायम असल्याने ऑक्टोबरच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील हवामान कसे राहते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Scroll to Top