खळबळजनक : ठाकरे गटाच्या विभागप्रमुखांची गोळ्या झाडून हत्या

मुंबई – ठाण्यामधील मानपाडा परिसरातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची मंगळवारी रात्रीच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
ही हत्या राजकीय संघर्षातून झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. शिंदे सेनेच्या नेत्या आणि ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे हे दोघे प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येमागील सूत्रधार असल्याचा आरोप पूर्णेकर कुटुंबाने केला आहे.

काल रात्री साडेनऊच्या सुमारास ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर यांच्या कार्यालयात पाच हल्लेखोरांनी शिरुन पिस्तुलमधून सात राऊंड फायर केले. त्यापैकी चार गोळ्या प्रदीप पूर्णेकर यांच्या शरीरात घुसल्या. पूर्णेकर यांचे कार्यकर्ते कार्यालयात पोहोचले तेव्हा ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तणाव पसरला होता.

Scroll to Top