इचलकरंजी – मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात काँग्रेससह इतर पक्ष आक्रमक झाले आहेत. देशभरात आंदोलन करून आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. इचलकरंजीत महात्मा गांधी पुतळ्याजवळ महाविकास आघाडी आणि मित्रपक्षांच्यावतीने केंद्रीय निवडणूक आयोग आणि केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निषेधार्थ आंदोलकांनी जोरदार घोषणा दिल्या. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि निष्पक्षता राखण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात महाविकास आघाडीतील विविध घटक पक्षांचे पदाधिकारी आणि मित्रपक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात इचलकरंजीत महाविकास आघाडीचे आंदोलन




