कोल्हापुरात राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे स्वागत…

कोल्हापूर – आज राज्यपाल जिष्णू देव वर्मा हे कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. आज सकाळी 10 च्या सुमारास त्यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजनिश कामत, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलगुरु डॉ. ज्योती जाधव, वारणा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, करवीर उपविभागीय अधिकारी मौसमी चौगुले उपस्थित होते. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे विमानतळावर आगमन होताच पोलीस दलाच्यावतीने ‘गार्ड ऑफ ऑनर’ (सलामी) देऊन मानवंदना देण्यात आली.

Scroll to Top