विसर्जन मिरवणुकीवेळी दारात फटाके लावल्यावरून तरुणावर कोयत्याने हल्ला

केर्ले पैकी मानेवाडीतील घटना

कोल्हापूर – करवीर तालुक्यातील केर्ले पैकी मानेवाडी येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत दारात फटाके लावण्याच्या कारणावरून तिघांनी अथर्व माने या 22 वर्षीय तरुणावर कोयत्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे.

अथर्व माने हा केर्ले पैकी मानेवाडी येथे कुटुंबियांसमवेत राहतो. शुक्रवारी सायंकाळी मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान अथर्व माने याने दारात फटाके लावल्याच्या कारणास्तव संग्रामसिंह दत्तात्रय माने, रणजीत दत्तात्रय माने आणि दत्तात्रय कृष्णा माने या तिघांनी माने याच्यावर हल्ला केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरु आहे. या प्रकरणी अथर्व माने यांच्या फिर्यादीवरून तिघांविरोधात करवीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Scroll to Top