कोल्हापूर अन् सांगली जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा दुष्काळाच्या यादीत समावेश

कोल्हापूर – पाण्याने समृद्ध जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्ह्याकडे पाहिले जाते. परंतु या वर्षी हवामान बदलामुळे राज्याला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे राज्य शासनाने आज राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा , राधानगरी, चंदगड, भुदरगड, आजरा, गगनबावडा या सहा तालुक्यांचा तर सांगली जिल्ह्यातील मिरज, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ अशा चार तालुक्यांचा दुष्काळाच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून विविध सवलती मिळणार आहेत

Scroll to Top