‘एकच मंत्र, एकच नारा, डीजे मर्यादेतच सारा..! ; विसर्जन मिरवणुकीत ‘या’ विद्यार्थ्यांनी वेधलं लक्ष

कोल्हापूर – आज सकाळपासून कोल्हापूर शहरात सुरु असलेल्या सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत ढोल – ताशा आणि डॉल्बीच्या गजरात कोल्हापूरकर मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. यावेळी डॉ. डी.वाय. पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हातात फलक घेवून डीजे विरोधात जनजागृती केली आहे. यावेळी ‘एकच मंत्र, एकच नारा डीजे मर्यादेतच सारा, कानठळ्या बसवणारा आवाज उत्सवाचा घालवतोय साज, भक्ती असावी मोठी डीजेची ध्वनी नाही मोठी, डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करा, अशा विद्यार्थ्यांच्या संदेशाने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Scroll to Top