पंचगंगा कारखान्यात आगीचा भडका…

इचलकरंजी – कबनूर परिसरातील पंचगंगा तथा रेणुका शुगर प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्यातील बगॅस सप्लाय करणाऱ्या चेन सिस्टीमला मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमाराला अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच इचलकरंजी महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. तसेच अन्य ठिकाणच्या अग्निशामक दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या. सुरक्षेच्या कारणास्तव याठिकाणचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. तब्बल पाच तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आले. मात्र, तोपर्यंत बगॅस सप्लाय करणाऱ्या चेन सिस्टीमचे मोठे नुकसान झाले होते. ही आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप समजू शकलेले नाही.

Scroll to Top