कोल्हापूर – प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्यावतीने दरवर्षी स्नेह संगीत प्रतिज्ञा मैफिलीचे आयोजन करण्यात येते. गेल्या साडेसात वर्षापासून ही परंपरा कायम असून या वर्षी उद्यापासून ही मैफिल भरवण्यात येणार आहे. या मैफिलीच्या माध्यमातून समाजातील गरजू रुग्ण, विद्यार्थी – विद्यार्थिनीं यांना 80 लाखांची मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे.
या मैफिलीत सलग 3 हजार 400 वे गीतगीत साने गुरुजी येथील विकास प्रतिज्ञा स्टुडिओत सायंकाळी 5 वाजता होणार आहे. यावेळी मैफिलीत स्नेह संगीत प्रतिज्ञाचे अमरसिंग राजपूत, अनिल मोरे, प्रिती देसाई, राजेंद्र चौगुले, निलांबरी जाधव, प्रसन्न कुलकर्णी, दिलीप माळी, अभिजित पाटील, अजित माने, नरहर कुलकर्णी, अभय देशपांडे, प्रशांत जोशी आदी गायक, कलाकार सहभागी होणार आहेत. ही मैफिल फेसबुक लाईव्हद्वारे सादर केली जाणार आहे.




