इचलकरंजीत रात्री दुभाजकाला धडकून कार पलटी ;  महिला गंभीर जखमी

इचलकरंजी – शहरातील ईदगाह मैदानासमोरील रस्त्याची अवस्था खराब असून या परिसरात रात्रीच्या वेळी विद्युत रोषणाईही कमी असते. शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास याठिकाणी रस्ता दुभाजकाला धडकून कार पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात कारमधील एका महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. स्थानिक नागरिकांनी जखमी महिलेला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. या अपघातातील कार चालकाला रस्त्यावरील दुभाजकाचा योग्य अंदाज आला नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, ईदगाह मैदानासमोरील रस्त्याची दुरवस्था आणि अपुऱ्या विद्युत रोषणाईचा मुद्दा या घटनेनंतर पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Scroll to Top