उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठवाड्यात येण्यास जरांगेंचा विरोध
छत्रपती संभाजीनगर – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतकरी मेळाव्यानिमित्त परभणी दौऱ्यावर येत आहेत. या शेतकरी मेळाव्याला मनोज जरांगे पाटील यांनी विरोध दर्शवला आहे. मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर सरकारकडून ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यात येऊ नये, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी, कार्यक्रम रद्द करा, अन्यथा मी तिथे येईन. मी अजून कुणावर चाल करून गेलेलो नाही, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे.
जरांगे पाटील यांनी परभणीचे खासदार बंडू जाधव यांना थेट फोन करून मेळावा रद्द करा, अन्यथा उपोषण सोडून परभणीत येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
पाच मिनिटांत कार्यक्रम रद्द करा. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला राज्यात धिंगाणा घडवून आणायचा आहे का?” कार्यक्रम रद्द न केल्यास परिस्थिती चिघळू शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.




