रात्रगस्त वाढवण्याची नागरिकांची मागणी
कोल्हापूर – शहरासह उपनगरात दारात ठेवलेले तांब्याचे बंब आणि पाणी मीटर चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. रविवारी रात्री शिवाजी पेठेतील संध्यामठ गल्ली परिसरातील काही रहिवाशांकडील पाणी मीटर अज्ञातानी लंपास केली आहे. आज सकाळी मीटर चोरीचा प्रकार उघडकीला आला आहे. पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन रात्रीच्या वेळी मध्यवस्तीत होणारे चोरीचे प्रकार रोखण्यासाठी रात्रगस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.




