शिवाजी स्पोर्ट्स अकॅडॅमीकडून फुटबॉल शिबिराला सुरुवात 
 

<p>शिवाजी स्पोर्ट्स अकॅडॅमीकडून फुटबॉल शिबिराला सुरुवात <br />
 </p>

कोल्हापूर - शिवाजी स्पोर्ट्स अकॅडॅमीच्यावतीने सानेगुरुजी वसाहतमध्ये फुटबॉल शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन  कर्नल दिलीप थोरात यांच्या हस्ते झाले. यावेळी संग्रामसिंह खर्डेकर हे प्रमुख उपस्थित होते. 
सकाळी ७ ते ९ या वेळेत हे शिबीर १५ मे पर्यंत सुरु राहणार आहे. या शिबिरात मुलांना तंत्रशुद्ध प्रशिक्षण तसेच अनुभवी खेळाडूंकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.
यावेळी बंटी सावंत, शिवाजी पाटील, उदय पाटील, किरण साळोखे, प्रमोद भोसले, सुशील गायकवाड, आशिष पाटील, शशिकांत नलवडे, संतोष कामते उपस्थित होते.