डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीकडून टेक्नोत्सव स्पर्धेला सुरुवात

<p>डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीकडून टेक्नोत्सव स्पर्धेला सुरुवात</p>

कोल्हापूर - कसबा बावड्यातील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीच्यावतीने अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना व्यासपीठ मिळावे, त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी दरवर्षी टेक्नोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या टेक्नोत्स्वचे  उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. संतोष चेडे, registrar एल. व्ही. मालदे, कन्व्हेनर्स डॉ. कपिल कदम, डॉ. प्रशांत जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कपिल कदम यांनी केले. यावेळी प्राचार्य डॉ. संतोष चेडे यांनी, सध्याचे युग हे स्पर्धेचे असून खूप मोठी आव्हाने समोर आहेत. सध्या जगात झपाट्याने टेक्नॉलॉजी बदलत आहे. आपल्याकडे अफाट बुद्धी आणि प्रतिभा आहे, त्याचा नवतंत्रज्ञान निर्मितीसाठी वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

या स्पर्धेत सिव्हिल विभागाकडून क्यूब क्रश चॅलेंज, द डिझायनर, टॉवरक्वेस्ट १५०, सिव्हिल क्लाश. सी.एस.ई विभागाकडून वेबॅथॉन, आयडिया कार्निव्हल, इन्फिनिटी हंट, प्लेसेक्स. केमिकल अभियांत्रिकी विभागाकडून प्रोजेक्ट डेव्हलपमेंट, प्रोजेक्ट कॉम्पिटिशन, मॉक प्लेसमेंट ड्राईव्ह अशा एकूण आठ विभागांच्या २९ प्रकारात ही स्पर्धा पार पडणार आहे.

या स्पर्धेसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, डी वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर ए.के. गुप्ता यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी विद्यार्थी समन्वयक आदित्य पाटील, ऋतुराज भंडारपुरे यांच्यासह स्पर्धक विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.