दूध उत्पादककेंद्री आणि स्वायत्त गोकुळ दूध संघासाठी राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला साथ द्या!

शिरोळ – गोकुळचा विकास, दूध उत्पादकांचे हित आणि संघाची स्वायत्तता हीच आमची भूमिका आहे. शेतकऱ्यांच्या विश्वासाला सर्वोच्च प्राधान्य देत, राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत शेतकरीकेंद्री घेतलेल्या निर्णयांना पुढे नेत दूध संघाचा विकास अधिक गतिमान करण्याचा आमचा संकल्प आहे. या भूमिकेला शेतकरी आणि दूध उत्पादकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे गोकुळच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपणही या शेतकरीकेंद्री वाटचालीला साथ द्यावी, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी ठरावधारकांना केले. राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचा शिरोळ -जयसिंगपूरमध्ये प्रचारादरम्यान ठरावधारकांशी संवाद साधला वेळी बोलत होते.

गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या माध्यमातून शिरोळ तालुका व जयसिंगपूर परिसरात जोरदार प्रचार मोहीम राबवण्यात आली. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील या आघाडीने परिसरातील दूध उत्पादक शेतकरी व ठरावधारकांशी थेट संवाद साधण्यासोबतच अनेक या प्रचार दौऱ्यादरम्यान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, जेष्ठ नेते गणपतराव पाटील, सावकार मादनाईक, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, रणजित पाटील, माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, आदी प्रमुख नेत्यांच्या भेटी घेऊन निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

श्री रत्नपार्वती महिला सहकारी दूध संस्थेच्या वतीने आमदार सतेज पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यानंतर जैनापूर, यड्राव, धरणगुत्ती, कवठेगुलंद, दत्तवाड आणि अब्दुल लाट येथील ठरावधारकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी गोकुळच्या माध्यमातून लाखो शेतकरी आपले जीवन सुखकर करत आहेत. आम्ही दूध दर आणि पशुखाद्य दराबाबत शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. म्हैस दूध दरामध्ये एकूण १४ रूपये तर गाईच्या दूधाला १० रुपयापर्यंत जादा दरवाढ दिली. म्हैस खरेदी अनुदान, सौरऊर्जा प्रकल्प, दही प्रकल्प, वाशी-मुंबई येथील पॅकिंग स्टेशन आणि दरवर्षी दिवाळीला दूध उत्पादकांना ११ कोटींचा फरक देऊन फायदा मिळवून देण्याचे काम आमच्या माध्यमातून झाले असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितलं.

दत्त समूहाचे गणपतराव पाटील यांनी शिरोळ तालुक्यात शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह हा दूध व्यवसाय आणि उसावरती अवलंबून आहे. गोकुळ हा केवळ दूध संघ नसून कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मजबूत आधारस्तंभ आहे. हजारो दूध उत्पादक शेतकरी, पशुपालक आणि त्यांच्या कुटुंबांच्या जीवनाशी गोकुळची नाळ जोडलेली आहे. त्यामुळे गोकुळची प्रगती म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांच्या जीवनमानाची प्रगती असल्याचं सांगितलं. दूध उत्पादक शेतकऱ्यांना अधिक सक्षम करणे, त्यांना योग्य मोबदला मिळवून देणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, दूध संकलन व प्रक्रिया व्यवस्था अधिक सक्षम करणे आणि गोकुळला भविष्यात आणखी मजबूत बनविण्यासाठी सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील निर्माण होणाऱ्या पॅनलला विजयी करावे असे समूहाचे गणपतराव पाटील यांनी आपले मत व्यक्त केले.

माजी आमदार राजू बाबा आवळे यांनीही महायुतीच्या राजकारणावर टीका केली. “गोकुळ दूध संघात आजपर्यंत कधीही पक्षीय राजकारण आले नव्हते. हा संघ कायम शेतकऱ्यांचाच राहावा हीच आमची अपेक्षा होती. मात्र महायुतीने यात राजकारण आणले आहे. हा संघ शेतकऱ्यांच्याच हाती राहिला पाहिजे, अन्यथा भाजपच्या हाती गेल्यावर भविष्यात हा संघ गुजरातला जाण्याची भीती आहे,” असा इशारा त्यांनी दिला.

गोकुळचे माजी चेअरमन रणजित सिंह पाटील-मुरगुडकर यांनी सतेज पाटील यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. गोकुळ हा दूध उत्पादकांच्या हितासाठी काम करणारा संघ आहे. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांत शेतकऱ्यांना खरा न्याय मिळाला आहे. गोकुळमध्ये घेतला जाणारा प्रत्येक निर्णय अभ्यासपूर्ण असतो, म्हणूनच आम्ही त्यांच्या पॅनलसोबत खंबीरपणे उभे आहोत.

यावेळी भवानी सिंह घोरपडे , मधुकर पाटील, चेअरमन रघुनाथ पाटील, दर्गु गावडे,पृथ्वीराज यादव, शेखर पाटील, जिल्हा परिषद सदस्य अर्चना चौगुले, सुदर्शन कदम, नितीन बागे , जयदीप थोरात, काँ. अप्पा पाटील, प्रफुल्ल पाटील, प्रदीप चव्हाण, राजू आवळे, प्रमोद पाटील, अमर यादव, विजय सूर्यवंशी, सुदर्शन कदम, सर्जेराव पवार, गुंडाप्पा पवार, धनाजी पाटील,शक्ती पाटील, ओमकार मुडशी यांच्यासह समविचारी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Scroll to Top