सहाव्या दिवशी 'देऊळ बंद 2' ने 3.35 कोटींचा जमवला गल्ला...
मुंबई – मुख्य भूमिका साकारलेले ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या 'देऊळ बंद 2' या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एन्ट्री करताच मोठ्या कमाईला सुरुवात केली आहे.
पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 'देऊळ बंद 2' ने 3.5 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 3.11 कोटींची, तिसऱ्या दिवशी 5.21 कोटींची, चौथ्या दिवशी या सिनेमाने 5.90 कोटींची मोठी कमाई केली तर, पाचव्या दिवशी या सिनेमाच्या कलेक्शनमध्ये घट होवून 3.40 कोटींचे कलेक्शन केले. काल सहाव्या दिवशी सिनेमाने 3.35 कोटींचा गल्ला जमवला आहे. आतापर्यंत भारतात या सिनेमाने 26.48 कोटींचे कलेक्शन केले आहे.