डॉ. डी. वाय. पाटील यांनी संघर्षातून विश्व उभं केलं – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी कसबा बावड्यातील यशवंत निवासस्थानी भेट देऊन पद्मश्री डॉ. डी. वाय.पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी पाटील कुटुंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी,डॉ. डी. वाय. पाटील यांनी संघर्षातून विश्व उभं केलं असून ते कृतार्थ जीवन जगले, अशी भावना व्यक्त केली .

यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर,मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, शिवेंद्रराजे भोसले,आमदार अशोकराव माने,आ. राहुल आवाडे आदी उपस्थित होते.

Scroll to Top