कोल्हापूर – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कर्नाटकचे मंत्री एच के पाटील आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उद्योजक अविनाश भोसले हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी कसबा बावड्यातील यशवंत निवास येथे जावून पद्मश्री डॉ. डी. वाय.पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. दरम्यान त्यांनी पाटील कुटुंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले.
यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी. पाटील, आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते.





