इतर

गोकुळसाठी कायदा बदलला.. मग देवस्थान समितीमधील भ्रष्टाचार प्रकरणी न्याय कधी ? : प्रसाद मोहिते

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीमध्ये सन २०१७ ते २०२१ या कालावधीतील पदाधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केलाय असा आरोप करत क्षत्रिय मराठा रियासत फौडेशनचे अध्यक्ष प्रसाद मोहिते यांनी पाठपुरावा केला होता. या प्रकरणी विधी न्याय खात्याकडे एप्रिल २०२६ मध्ये दोषारोप पत्र दाखल देखील झाले आहे. मात्र सहा महिने उलटून गेले तरी याबाबतीत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. गोकुळ मधील सत्तेसाठी कायदा बदलणारे राज्य सरकार या भ्रष्टाचार प्रकरणी न्याय कधी देणार? असा सवाल मोहिते यांनी उपस्थित केला आहे.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यासाठी सर्वपक्षीय नेतेमंडळींनी एकत्र यावे, असे आवाहनही मोहिते यांनी केले आहे.

संबंधित विषय

Scroll to Top