नवी दिल्ली – सोमवारी सर्वोच्च न्यायालयात वकील प्रवीण सिंघल हे न्यायव्यवस्थेतील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांशी संबंधित एका प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी न्यायालयाकडे करत होते. परंतु सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी, त्यांना थोडी प्रतीक्षा करण्यास सांगितले. यावर सिंघल संतापले आणि त्यांनी सरन्यायाधीशांच्या पात्रतेवर आणि प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “तुम्ही या खुर्चीवर बसण्याच्या लायकीचे नाही, तुमच्यात तेवढी नैतिकता नाही” अशी टिप्पणी त्यांनी भर न्यायालयात केली.
यावर आज न्यायालयाने वकील प्रवीण सिंघल यांना अवमान नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनने, प्रवीण सिंघल यांच्यावर फौजदारी अवमान कारवाईची मागणी केली होती. यावर न्यायमूर्ती दिपांकर दत्ता, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने कथित अवमान करणारे वकील प्रवीण सिंघल यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.




