कृषी

राज्यातील सर्व साखर कारखान्यांच्या मासिक साखर साठ्यावर केंद्र सरकारची नजर…

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

साखर साठयाच्या मर्यादेचं उल्लंघन झाल्यास थेट कारवाई होणार

नवी दिल्ली – बाजारात साखरेचा कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ नये तसेच दर नियंत्रणात रहावे. यासाठी केंद्र सरकारने कारखान्यांच्या साखर साठवणुकीवर कडक नजर ठेवली आहे.

मासिक साखरसाठा मर्यादीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कडक धोरण राबविले आहेत. यासाठी १३ नोव्हेंबरला महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक यासह देशातील सर्वच साखर कारखान्यांसाठी एक परिपत्रक जारी केले आहे. ज्यामध्ये मासिक साखरसाठा मर्यादेचे उल्लंघन झाल्यास थेट शासकीय अनुदान रोखण्याची कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
गतवर्षी साखरेचे किरकोळ विक्रीचे दर ३८ ते ४० रुपये होते. दोन-तीन महिन्यांपूर्वी ते ८० रुपयांपर्यंत गेले होते. आताही ते ५६ ते ५७ रुपये आहेत. कारखान्यांकडूनच ५ हजार ते ५२५० रुपये प्रतिक्विंटल दराने साखरेची बाजारात विक्री केली जाते. कारखान्यांनी साखरेचा साठा केल्यास बाजारात साखरेचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

संबंधित विषय

Scroll to Top