मुंबई – गोकुळ दुध संघात सुरु असलेल्या घडामोडीवर खा. संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत, “पराभव पचत नसेल तर, महाराष्ट्रात राजकारण करायची लायकी नाही”, अशी महायुतीवर सडकून टीका केली आहे.
गोकुळमध्ये समविचारी पॅनलला बहुमत मिळाल्यानंतरही पराभूत उमेदवारांना सत्तेवर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा लोकशाहीचा अनादर असून शेतकऱ्यांच्या भावनांशी बेईमानी आहे. साडेपाच लाख शेतकऱ्यांनी लोकशाही मार्गाने आपले पॅनल निवडून दिले आहे. असे असतानाही त्यांचा कौल डावलून जर गुजरात लॉबीला गोकुळ विकण्याचा डाव सुरू असेल, तर ते महाराष्ट्राशी आणि शेतकऱ्यांशी गद्दारी करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या जनमताचा अनादर करण्याच्या या नवीन परंपरेची किंमत त्यांना मोजावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.




