आरोग्य

दिवाळीच्या काळात सीपीआरमधील ओपीडी दोन दिवस राहणार बंद… आपत्कालीन सेवा सुरू

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – दिवाळी उत्सवानिमित्त सार्वजनिक सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयमधील बाह्यरुग्ण विभागाचे(ओपीडी) कामकाज ८ आणि १० नोव्हेंबर रोजी बंद राहणार असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे.
९ आणि ११ नोव्हेंबर रोजी ओपीडी नियमितपणे सुरू राहणार आहे. या दरम्यान, रुग्णालयातील अपघात विभाग, सर्व वैद्यकीय सेवा, आंतररुग्ण विभाग (आयपीडी) तसेच तातडीच्या शस्त्रक्रिया सेवा २४ तास पूर्ण क्षमतेने सुरू राहणार आहेत. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना आवश्यक वैद्यकीय सेवा अखंडितपणे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील नागरिक व रुग्णांनी ओपीडीच्या बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घेऊन त्यानुसार रुग्णालयात यावे, असे आवाहन छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी केले आहे.

संबंधित विषय

Scroll to Top