न्यायालय

खळबळजनक : राज्यातील अनेक न्यायालयांना धमकीचा ई मेल

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

मुंबई – राज्यातील अनेक जिल्हा न्यायालयांना धमकीचा ई-मेल आला आहे त्यामुळे खळबळ उडाली आहे. यामध्ये ठाणे, सांगली, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोलीसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील न्यायालयाला धमकीचा ई-मेल आला आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून अधिक तपास सुरू आहे.

सायबर पोलिसांकडून ई-मेल पाठवणाऱ्या आरोपीचा शोध घेतला जात आहे. 27 नोव्हेंबरपर्यंत ठाणे जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच मेट्रो स्थानकांवर रात्री 9.11 वाजता बॉम्बस्फोट घडवण्याचा उल्लेखही करण्यात आला आहे. सन 1984 मधील रक्तपाताचा बदला रक्ताने घेण्याचा उल्लेख या ई-मेलमध्ये केला आहे. आपण दिलजीत दोसांझ याचा साथीदार असल्याचा उल्लेख करत, 27 नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्स येथे होणाऱ्या कार्यक्रमात आयफोनमध्ये आयईडी ठेवून बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी आरोपीने दिली आहे.
धमकीचा मेल आल्यानंतर सर्व न्यायालयाच्या इमारतींच्या तपासणीसाठी जिल्हा पोलीस दल, बॉम्बशोधक आणि श्वान पथकासह न्यायालयाच्या इमारतीत दाखल झाले आहेत. सर्व न्यायाधीश ,वकील आणि पक्षकार यांना न्यायालयातून तातडीने बाहेर घेण्यात आले आहे.

संबंधित विषय

Scroll to Top