पुणे – कालपासून विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या पाच जागांसाठी मतमोजणी होत आहे. अद्याप मतमोजणी सुरु असून पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव या आघाडीवर आहेत. त्यांना विजयासाठी १ हजार ७५० मतांची गरज असुन त्यांना किती मते मिळतात हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रथम पसंतीच्या मतांची मोजणी पूर्ण झाल्यानंतरही विजयासाठी आवश्यक असलेला १ लाख १३ हजार ९५ मतांचा कोटा पूर्ण न झाल्याने पुढील पसंतीच्या मतांची मोजणी सुरू आहे. आतापर्यंत २६ व्या बाद फेरीनंतर हर्षदा देशमुख-जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार पक्ष) यांना १ लाख ११ हजार ३४९ मते मिळाली आहेत, तर डॉ. स्मिता योगेश जाधव यांना १ लाख २ हजार ४७९ मते मिळाली आहेत.
इतर उमेदवार :
- सुनिल जबरचंद मोदी (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) – ३ हजार ६६ मते
- सोमनाथ जनार्धन साळुंखे – २ हजार ६३८ मते
- नामदेवराव जाधव – १ हजार ९५५ मते
- लक्ष्मण साहेबराव हरणावळ – १ हजार ४७२ मते




