ब्रेकिंग न्यूज
आरोग्य

पाच दिवसांच्या अंतराने बाप-लेकांचे निधन ; मरणोत्तर अवयवदानातून जपली सामाजिक बांधिलकी

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

पित्यानं नेत्रदान, तर पुत्रानं केलं दोन मूत्रपिंड आणि यकृतदान

कोल्हापूर – शहरातील कसबा-बावडा येथील कृष्णानंद कॉलनीमधील निवृत्ती विठोबा इंगळे (वय ८८) आणि पुत्र कृष्णात निवृत्ती इंगळे ऊर्फ बापू (वय ५६) या बाप-लेकांचे अवघ्या पाच दिवसांच्या अंतराने निधन झाले. यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. असं असताना इंगळे कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकी जपत समाजाला माणुसकीचा संदेश दिला आहे.
या बाप – लेकाने मरणोत्तर अवयवदानातून समाजासमोर मानवतेचा आदर्श ठेवला आहे. निवृत्ती इंगळे यांचे ९ ऑक्टोबर रोजी तर त्यांचे पुत्र कृष्णात इंगळे यांचे १४ ऑक्टोबर रोजी निधन झाले. पित्याच्या निधनाचे दुःख ताजे असतानाच अवघ्या पाच दिवसांत पुत्राचेही निधन झाले. निवृत्ती इंगळे यांनी मरणोत्तर नेत्रदान केले, तर कृष्णात इंगळे यांनी दोन मूत्रपिंडे आणि यकृतदान केले. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीमुळे मृत्यूनंतरही इतरांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करू शकतो हे यांनी दाखवून दिले आहे.

इंगळे बाप-लेकांचे निधन ही त्यांच्या कुटुंबियांसाठी मोठी हानी आहे. मात्र, मरणोत्तर अवयवदानाच्या माध्यमातून त्यांनी समाजाला दिलेला मानवतेचा संदेश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.

संबंधित विषय

Scroll to Top