ब्रेकिंग न्यूज
कृषी

तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का ? ; राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटील यांच्यावर हल्लाबोल

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – सध्या दिल्लीतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक निष्फळ ठरल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. यंदाच्या हंगामात ऊसाला 5 हजार 500 रुपये दर मिळावा, अशी मागणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली होती. यावर बोलताना माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी, तुमच्या काकाने 5 हजारांचा दर ठेवलाय का असा सवाल केला होता. या सवालाला राजू शेट्टी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
50 रूपये साखरेची एमएसपी व 70 रूपये इथेनॅालचा दर करून आम्ही पाच हजार रूपये उसाचा दर मागितला आहे. तुम्ही अनेक वर्षे साखर संघाचे अध्यक्ष म्हणून खूर्ची उबवली, तरी गेल्या आठ वर्षात साखरेची एमएसपी वाढली नाही तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का? ऊसाचा दर जाहीर न करता ऊस तोडायला ती काय तुमच्या बापाची पेंड आहे का? असा हल्लाबोल राजू शेट्टी यांनी केला आहे.

संबंधित विषय

Scroll to Top