ब्रेकिंग न्यूज
न्यायालय

माधुरी हत्तीण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा ‘पेटा’ ला दणका

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – माधुरी हत्तीणला नांदणी मठात परत पाठवल्यानंतर तिला पुन्हा साखळदंडांनी बांधून एकाकी अवस्थेत ठेवण्यात आल्याचा दावा प्राण्यांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या पेटा इंडिया या संस्थेने केला होता. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने तातडीने हस्तक्षेप करत माधुरीला पुन्हा वनतारामध्ये पाठवावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

या याचिकेवर आज न्यायमूर्ती पारडीवाला आणि न्यायमुर्ती विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणी वेळी न्यायालयाने पेटाच्या भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. न्यायालयाने पेटाची याचिका फेटाळून लावून त्यांना पंचवीस हजाराचा दंड ठोठावला. दंडाची ही रक्कम माधुरीच्या उपचारांसाठी वापरण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पेटाची याचिका फेटाळल्याने माधुरी आता नांदणी मठातच राहणार हे स्पष्ट झाले आहे.

संबंधित विषय

Scroll to Top