फुलेवाडीत माजी कृषी राज्यमंत्री स्व. श्रीपतराव बोंद्रे यांना अभिवादन

कोल्हापूर : महाराष्ट्राचे माजी कृषी राज्यमंत्री स्व. श्रीपतराव शंकरराव बोंद्रे यांच्या २६व्या पुण्यतिथीनिमित्त फुलेवाडी येथील महात्मा ज्योतीराव फुले विकास सेवा संस्था येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते स्व. श्रीपतराव बोंद्रे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रातील योगदानाचे यावेळी स्मरण करण्यात आले.

कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन शामराव माने, महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते इंद्रजीत बोंद्रे, नगरसेवक राहुल माने, सदाशिव पाटील, पंडितराव बोंद्रे, बाळासाहेब पाटील, जयसिंग माने, नंदू पिसे, अर्जुन माने, प्रकाश इंगवले, नंदकुमार दिवसे, विजय दिवसे, अतुल बोंद्रे, प्रताप इंगवले, अमर अपराध यांच्यासह सहकार समूहातील विविध संस्थांचे संचालक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Scroll to Top