निवडणूक आयोगाने ECINet पोर्टलवर केला मोठा बदल

नवी दिल्ली – निवडणूक आयोगाच्या ‘ECINET’ पोर्टलवर ‘एसआयआर’ संदर्भातील फॉर्म ६ हे घोषणापत्र जोडण्यात आले होते. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने पोर्टलमध्ये मोठा बदल करत फॉर्म ६ हटवले आहे. निवडणूक आयोगाने ज्या राज्यांमध्ये ‘एसआयआर’ प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तेथील ECINET पोर्टलवरील फॉर्म ६ मधून हे वादग्रस्त घोषणापत्र हटवले आहे. आयोगाने २६ सप्टेंबर रोजी केलेल्या घोषणेनंतर अवघ्या चारच दिवसांत हा मोठा बदल केला आहे.

Scroll to Top