राज्यातील काही लघु ठेकेदारांनी राहुल गांधींची घेतली भेट…

न्यायासाठी शेवटपर्यंत लढण्याचा दिला विश्वास

नवी दिल्ली – महाराष्ट्रातील लघु ठेकेदारांच्या एका शिष्टमंडळाने लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने, राज्यातील चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्र सरकार हे दिवाळखोरीत निघाले आहे. तसेच ठेकेदारांना अनेक बिले दिली जात नाहीत. नियमांमध्ये फेरफार करून मोठ्या ठेकेदारांना लाभ दिला जात असल्याचा आरोप राज्यातील काही लघु ठेकेदारांनी केला आहे. यावर बोलताना खा. राहुल गांधी यांनी, तुमच्या हक्कांसाठी आम्ही आवाज बुलंद करू आणि न्यायासाठी शेवटपर्यंत लढू, असा विश्वास शिष्टमंडळाला दिला.

Scroll to Top