कोल्हापूर – शहरातील राजाराम बंधाऱ्याच्या तलावात मगरीचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. जयदेव कदम यांना काल रात्री साडेदहाच्या सुमारास तलावात मगर दिसून आली आहे. अंदाजे ८ ते ९ फूट लांबीची ही मगर असल्याची माहिती जयदेव कदम यांनी दिली आहे. तलावातील मगरीच्या वावरामुळे राजाराम बंधारा परिसरात सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
राजाराम बंधारा परिसरात सावधानतेचा इशारा ; तलावात मगरीचं दर्शन




