शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

कोल्हापूर – आज सकाळपासून कोल्हापूर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरुवात झाली आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मानाच्या तुकाराम माळी मंडळाच्या श्रींच्या आरतीने शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.

दरम्यान श्री अंबाबाई मंदिरातील मानाच्या गणपतीचा रथ आकर्षक फुलांनी सजवण्यात आला असून  महालक्ष्मी भक्त मंडळाकडून विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली  आहे.

Scroll to Top