पंचगंगा नदीकडे जाणाऱ्या मार्गावर बॅरिकेटिंग…कृत्रिम कुंडात बाप्पांच्या विसर्जनाला सुरुवात

कोल्हापूर – पंचगंगा नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी नदीत मूर्ती तसेच निर्माल्य विसर्जन करू नये, यासाठी महापालिका प्रशासनाने पंचगंगा नदीकडे जाणाऱ्या मार्गावर बॅरिकेटिंग लावले आहेत. यावेळी कोणताही अनुचित घडू नये. यासाठी पहाटेपासून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महापालिकेच्यावतीने स्व. आमदार संजय गायकवाड यांच्या पुतळ्याजवळ कृत्रिम विसर्जन कुंड ठेवण्यात आले असून विसर्जनाला सुरुवात झाली आहे. दरम्यान इराणी खणीत गणपती विसर्जनाला सुरुवात झाली आहे.

Scroll to Top