कोल्हापूर – गणेशोत्सव काळात सार्वजनिक शांततेचा भंग होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी राजारामपुरी पोलिसांनी रेकॉर्डवरील ६३ जणांना गणेशोत्सव काळासाठी नोटीस बजावून शहर आणि करवीर तालुक्यातून हद्दपार केले होते. मात्र यातील करण सकट, स्वरूप सावंत, गोविंद नायडू, चेतन दिंडे, आकाश माळी आणि संजय गवळी या सहा जणांनी हद्दपारीच्या आदेशाचा भंग करून शहरात प्रवेश केल्याबद्दल राजारामपुरी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
हद्दपार असताना शहरात शिरले…पोलिसांच्या जाळ्यात अडकले




